त्रिखंडात न गाजवलेल्या पण विश्वप्रसिद्ध तीन उड्या

त्रिखंडात न गाजवलेल्या पण विश्वप्रसिध्द तीन उड्या…

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या तीन महान उड्या …

पहिली उडी : वसंतदादा पाटलांची..

सांगलीतील गणेशदुर्गाच्या तुरुंगाच्या तटावरून दादा व त्यांच्या १४ सहकाऱ्यांनी पोलिसांच्याच बंदुका पळवुन थेट खंदकात उड्या मारल्या. पोलिसांनी गोळीबाराच्या फैरी झाडत दादांचा भर बाजारातून चित्तथरारक पाठलाग केला. त्यात दादांचे २ सहकारी हुतात्मा झाले. पळत पळत कृष्णेवरील पुलावर आले असताना दादा व त्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी क्षणाचाही विचार न करता वंदे मातरम म्हणत पुलावरून रो रो रोरावणाऱ्या कृष्णेच्या महापुरात ४० फुटांवरून उड्या ठोकल्या. गोळ्यांचा पाऊस सुरूच होता त्यात स्वतः दादा खांद्यावर गोळी लागून जखमी झाले.
वसंतदादांची ही उडी आणि हे तुरुंग फोडून पलायन एखाद्या साहसी हॉलिवूडपटात शोभेल असेच आहे. ग्रेट एस्केप किंवा वन दॅट गॉट अवे आठवत असेलच…

दुसरी उडी : क्रांतीसिंह नाना पाटील यांची..

क्रांतीसिंह नाना पाटील यांना सावरकर चेल्यांच्या गुप्त सुचने वरून इंग्रजांनी पकडल्या नंतर नाना पाटील यांनी धावत्या रेल्वेमधून दुथडी भरुन वाहाण कृष्णा नदीच्या पात्रात इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन मारलेली उडी.

तिसरी उडी : पद्मभूषण नागनाथ अण्णा नाईकवडी यांची..

अण्णांनी वसंतदादांच्या साहसापासून प्रेरणा घेत सातारचा अभेद्य सेलुलर जेल फोडला. आणि तटावरुन उडी मारून, अभेद्य समजला जाणारा सातारा जेल फोडून, ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन यशस्वी पलायन केले.

मात्र या चित्तथरारक तीन उड्या इतिहास रचणारे आणि इतिहास लिहिणारे वेगळे असल्याने ‘त्रिखंडात’ गाजल्या नाहीत.

error: Content is protected !!
Scroll to Top