शिवचरित्र काय शिकवते ?

शिवचरित्र काय शिकवते ?

वाचा,विचार करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा…

छत्रपती शिवराय हे फक्त व्यक्ती नव्हते, ते एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे व्यक्ती ते व्यक्तिमत्त्व होण्यापर्यंतचा प्रवास सहज नाही. आपल्या आयुष्यात त्यांनी पाळलेली काही तत्वे याद्वारे ते तिथपर्यंत पोहोचले. आपण आज शिवचरित्रातुन काय शिकायचे ते जाणुन घेऊया…

१) आपल्या अंगी जिद्द बाणवा. या जिद्दीनेच जगातील कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते. त्यासाठी कुठलेही काम करताना जिद्द हवीच…

२) प्रत्येक क्षण आणि संधी ओळख, तिचा उपयोग करुन  घ्या. प्रगतीचा प्रवास फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे चालला आहे. म्हणुन आपल्या संपुर्ण ताकदीने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय मिळवु शकाल…

३) आपल्या मार्गावर एकटे असला तरी घाबरु नका. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि त्यांच्याच वाटेने दुसऱ्यांनी अनुकरण केले आहे…

४) एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणाला घाबरुन विचलीत होऊ नका. कर्तव्यापासुन परावृत्त होणे हा मुर्खपणा आहे. एकाकीपणा हा आपल्या स्वतःमध्ये लपलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीला विकसीत करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबुन राहिल्याने तुम्ही आपल्यातल्या उच्च गुणांना उजेडात आणु शकता…

५) धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात निर्माण होते. स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. आवश्यक असेल तर जगाला आव्हान द्यायची तयारी ठेवा…

६) जीवनात चढ-उतार हे येतच असतात. म्हणुन नेहमी सकारात्मक रहा…

७) कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला अजिबात दुःखी करुन घेऊ नका. स्वतःच्या मनाला नेहमी चांगल्या कामात गुंतवुन ठेवा. जीवनात गांभीर्य ठेवा. बेसावधपणे राहुन तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतलात तर दुःख तुमच्या वाट्याला येईल आणि तुमची परिस्थिती अधिकच वाईट होऊन जाईल…

८) अहंकार माणसाचा शत्रु आहे. या अहंकारापासुन तितकेच दुर रहा, जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासुन दुर असता…

९) आपल्याला वारंवार अपयश येत असेल तर याबाबत दुःख करत बसु नका. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करत राहा. आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल…

१०) चला मग उठा, जागे व्हा ! जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबु नका…

वाचा शिवजयंतीचा वाद घालणाऱ्यांना महाराजांचे पत्र

वाचा आजच्या शिवप्रेमींसाठी आचारसंहिता

वाचा शिवरायांच्या कुटुंबातील दुर्लक्षित व्यक्ती

संकलन – लोकराज्य टीम.