तानाजी मालुसरे आणि शेलारमामांच्या पराक्रमातुन आपण काय शिकावे ?

मावळ्यांचा पराक्रमी इतिहास काय सांगतो ?

आपल्या इतिहासाबद्दल आपण लोक खुप अभिमानी असतो. परंतु इतिहासाचा केवळ जागर करुन चालत नाही, त्याच्या संदर्भाने मिळणाऱ्या प्रेरणा वर्तमानात जगताना आपल्या जीवनात अनुसरता यायला हव्यात.

आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींचा त्रास होतो. मनाविरुद्ध अजिबात सहन होत नाही. दुसऱ्याच ऐकायचं नसते. सगळं जग आपल्यालाच खायला उठलं आहे असं वाटतं आणि आपण अजुन खचुन जातो. आपण नैराश्यात जातो.

आपण म्हणतो आपण इतिहास शिकलो. पण शिकलो नाहीच मुळी, फक्त परीक्षेपुरता अभ्यास केला. आठव इतिहासाच्या पुस्तकातील सिंहगडचा धडा. तानाजी मालुसरे आठवतात का ? स्वतःच्या मुलाचे लग्न सोडुन लढायला गेलेले. काय काम करायचे ते ? युद्ध ? ते सुद्धा तलवार आणि ढाल घेऊन.

जन्म मृत्यु असं कितीसं अंतर असतं ? एका क्षणाचं ? आपण आई-बाबांच्या सांगण्यावर जीव द्यायला तयार होऊ का ? मग तानाजी कुठल्या आशेने मरायला तयार झाले होते ? तेही त्यांना असं काय मिळणार होतं? किती आनंदाने ते लढायला गेले. किती दुर्दम्य इच्छाशक्ती होती त्यांची ?

चौथीचा धडा आठवतो का ? अंगावर, छातीवर वार झेलत तानाजी लढत होते, ढाल तुटली, पागोटं रक्ताने भरलं. तरीही ते त्वेषाने लढतच राहिले. अंगरखा रक्ताने माखला, रक्त भळाभळा वाहायला लागलं. त्यावेळी वाचताना त्यांचे कर्तुत्व कळत नसेल, पण आज त्याचे संदर्भ लागतात. असा वाटतं थोड्या थोड्या गोष्टीने कुरकुर करणारे आपण आणि अंगावर वार झेलणारे तानाजी. किती फरक आहे. आणि म्हणुनच त्यांचे नाव आज इतिहासात अमर आहे.

खरी गम्मत तर पुढे आहे. ८० वर्षाचे शेलार मामा ! काय विचार आले असतील त्यांच्या मनात. समोर तानाजी रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. धिप्पाड उदयभान लढतोय, काय आले असेल त्यांच्या मनात ? त्यांना दुखः झाले असेल का ? की भीती वाटली असेल त्या क्षणी उदयभानाला पाहुन ? त्यांच्या मनात पळुन जावे असा वाटला असेल का ? किती हिमतीने त्यांनी तरण्याबांड उदयभानावर वार केला असेल ? नक्की अशी काय उर्जा होती त्यांच्यामध्ये जी आपल्यामध्ये नाही ? आजुबाजुची परिस्थिती बदलण्याची टाकत ८० व्या वर्षी कुठुन आली असेल ?

या सगळ्यांचा विचार करत असताना आपण कुठे आहोत ? आपल्या आयुष्यातील संकटांशी लढताना निराश होतो का ? याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

इतिहासाचा जागर करत असताना तानाजी मालुसरे आणि शेलारमामांच्या चरित्रातुन आपण काय शिकायला हवे ?

● सकारात्मकता
किल्ला (संकट) कितीही कठीण अवघड असला तरी त्यावर मात करायचा एक तरी मार्ग असतोच.

● कर्तव्यदक्षता
आपल्या भावनांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्व द्या.

● ध्येयनिष्ठा
ध्येय साध्य करण्यासाठी वयाचा विचार करण्याची गरज नसते.

● प्रयत्नवाद
ध्येयाच्या मार्गावर असताना परतीचे दोर कापुन टाकले तर ध्येयाकडे अधिक लक्ष केंद्रित होऊन ध्येय साध्य करता येते.

● तानाजी मालुसरे पडल्यानंतरचा शेलारमामाचा आवेश निराशामग्न तरुणाला कार्यक्षम बनविण्यास प्रेरणा देतो.

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top