छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारविषयक धोरण हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. “साहुकार (व्यापारी) हे राज्याचे भूषण आहेत” असे त्यांचे ब्रीद होते. त्यांनी देशी व्यापाऱ्यांना परदेशात व्यापार करण्याची मुभा दिल्याने शिवकाळात व्यापार वाढीस लागला. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. परदेशी व्यापाऱ्यांनाही त्यामुळे उत्तेजन मिळाले. शिवरायांच्या प्रयत्नांमुळे स्वराज्याचा व्यापार जवळजवळ २५ देशातील व्यापाऱ्यांसोबत सुरु होता. ते पंचवीस देश आणि व्यापारी कोणते ते पाहुया…
१) पोर्तुगाल – फिरंगी, क्रिस्त, किरिस्ताव, पोर्तुगीज
२) इंग्लंड – इंगरेज, इंग्रज
३) हॉलंड – वलंदेज, डच
४) फ्रांस – फरांसिस, फ्रेंच
५) डेन्मार्क – दिनमार्क, डिंगमार, दीडमार
६) नॉर्वे – निविशयान, नॉर्वेजिअन
७) ग्रीक – ग्रेग, यवन
८) इटालियन – लतियान, लॉटीअन, तलियना
९) ज्यु – यहुदीन
१०) शंटलंडियन – कसतल्यान
११) वेनेशिअन – विअज
१२) स्विस – सुवेस, सुईस
१३) पोमॉरॉनिअन – प्रेमरयान
१४) जर्मन – जनामारी
१५) अर्मानिअम – अरमान
१६) रुमानिअन – रुमियान, रुन, तुराणी, तुर्की
१७) अबिसिनिअन – हबसी, शिद्दी
१८) इस्तंबुल – इस्तंबील
१९) चीन – चिनदेशिय
२०) इराण – इराणी
२१) मॉरिशदेशीय – मोरस
२२) आफ्रिका खंडातील – आफरीदी
२३) रशियन – उमर, उरुस, रुशन
२४) जॉर्डन – रबातियन
२५) स्पेन – अस्पिहानी, स्पॉनिउडस
भारतातील पाच प्रदेशातील व्यापाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी व्यापार झालेला दिसतो.
१) ब्रह्मदेश – ब्रह्येय
२) सिंधी – सिंध
३) गुजरात – सुस्त, सूरत, गुजराथी
४) आसामी – नाग
५) केरळ – नायर
संदर्भ – शिवकालीन महाराष्ट्र.
वाचा
शिवरायांच्या ८ पत्नी, ६ मुली आणि २ मुले
शिवरायांच्या प्रशासनाची ८ वैशिष्ट्ये
काय सांगते शिवरायांची राजमुद्रा
संकलन – लोकराज्य टीम.