छत्रपती संभाजी महाराजांचे विशेष कर्तृत्व

छत्रपती संभाजी महाराजांचे विशेष कर्तृत्व

छत्रपती शंभुराजांनी आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात काय काय केले ?

१) युद्धभुमीवरील सुरक्षेची गरज लक्षात घेऊन शंभुराजांनी केवळ एक महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जाकीट तयार केले.

२) जगातील पहिला तरंगता तोफखाना शंभुराजांनी तयार केला.

३) जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शंभुराजांनी उसळत्या लाटांच्या सागरात आठशे मीटरचा तरंगता सेतु शंभुराजांनी बांधला.

४) आदिलशाही आणि कुतुबशाहीची एकजुट करुन सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवण्याचे काम शंभुराजांनी केले.

५) जगातील सर्वात बलाढ्य सत्ताधीश असणाऱ्या मोगलांचा शंभुराजे कर्दनकाळ ठरले.

६) दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणुन डोंगर पोखरुन जलनियोजन करण्याचे काम शंभुराजांनी केले.

७) उत्तरप्रदेशापासुन दूर राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडु प्रांतातील लोकांना स्वराज्यासाठी एकत्रित करण्याचे काम शंभुराजांनी केले.

८) इतर धर्मांचा मानसन्मान करत असतानाच धर्मांतरावर बंदी घालण्याचे काम शंभुराजांनी केले.

९) शंभुराजांनी आपल्या राज्यात बालमजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा केला.

१०) शिवप्रभुंची इच्छा पुर्ण करण्यासाठी आपला राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या पंधराव्या दिवशी शंभुराजांनी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपुरवर छापा घालुन स्वराज्याची आर्थिक संपन्नता वाढविली.

११) शंभुराजांनी देहु ते पंढरपुर आषाढ वारीला संरक्षण व अर्थ पुरवठा केला.

१२) शंभुराजांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पिक कर्ज योजना राबविली.

१३) सैनिकांच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणुन शंभुराजांनी चराईची सवलत कायम ठेवली.

१४) आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी शंभुराजांनी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेतले. त्यातुन जगातील ताकदवान आरमाराची त्यांनी रचना केली.

१५) स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करुन शंभुराजांनी स्वदेशीचा महामंत्र दिला.

१६) शंभुराजांनी इंग्रजांचा धोका ओळखुन त्यांच्याकडे असणारे मुंबई बेट विकत मागितले होते. इंग्रजांना खेटण्याचा प्रयत्न सुरुवातीला शंभुराजांनी केला.

१७) वयाच्या केवळ २४ व्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती होऊन शंभुराजांनी स्वराज्याच्या सीमा आणि सैन्य दुप्पट वाढवले आणि स्वराज्याचा खजिना तिप्पट वाढविला.

१८) शंभुराजांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासुनच बुधभुषणम, नायिकाभेद, शातशतक, नखशिख असे राजनीती, नृत्य, अध्यात्मपर ग्रंथ लिहले.

१९) शंभुराजांनी आपल्या आयुष्यात जवळजवळ आठ वेगवेगळ्या भाषा अवगत होत्या. इंग्रजी भाषा ते अस्खलितपणे बोलत असत. वेगवेगळ्या भाषांचे त्यांनी अध्ययन केले.

२०) दिल्ली सम्राट औरंगजेब याला त्याच्या शाही तख्तापासुन २७ वर्षे दुर ठेऊन स्वराज्याच्या मातीत शेवटचा श्वास घ्यायला भाग पाडण्याचा पराक्रम शंभुराजांनी केला.

वाचा –

१.छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

२) श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याची भुमिका

३) छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोपांचे सप्रमाण खंडन

संकलन – लोकराज्य टीम.