मराठा सेवा संघ

मराठा सेवा संघ

मराठा सेवा संघाने काय केले ?

“महाराष्ट्राच्या सामाजिक भुमीची नव्याने मशागत केली…

समाजाला
“जय जिजाऊ जय शिवराय”,
“एक मराठा लाख मराठा”
अशी आपुलकीची घोषवाक्यं दिली…

राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला “जय जिजाऊ” असे अभिवादनमुल्य प्राप्त करुन देऊन लाखो लोकांना एकत्र आणले…

राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणतेही चित्र उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवुन ते अधिकृत करुन राज्याच्या मंत्रालयात लावुन घेतले…

विधानसभेत चर्चा घडवुन शिवजयंतीची १९ फेब्रुवारी ही अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली…

१२ जानेवारी जिजाऊजयंती सिंदखेडराजा
१९ फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी
१४ मे शंभुजयंती किल्ले पुरंदर
६ जुन शिवराज्याभिषेक किल्ले रायगड
हे उत्सव सुरु केले…

२९ ऑगस्ट हा दिवस शेतकरी दिन म्हणुन महाराष्ट्राला दिला…

पानिपतच्या युद्धातुन वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवुन आणला…

धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिली आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला…

इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करुन इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांवर दहशत बसविली…

महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली…

लेखकांना वाचकवर्ग दिला
वक्त्यांना श्रोतावर्ग दिला
कलाकारांना प्रेक्षकवर्ग दिला
महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला…

धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली.

आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरु नये ही आचारसंहिता दिली…

युवकांना बुटाच्या पॉलिशपासुन डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली…

धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचारप्रसारमाध्यमसत्ता यांचे महत्व समाजाला पटवुन दिले…

अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि न्युनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणे आहेत याची समाजाला जाणीव करुन दिली…

समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध-तुकोबा-शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही साखळी समजावुन सांगितली…”

१९९० पासुन मराठा सेवा संघ हा पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार बनुन उभा राहिला आहे. खरंतर मराठा सेवा संघाने काय केले हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीच पडत नाही. मात्र समाजातील धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ आणि त्याचे विचार पोहोचुन दिले नाहीत. त्यांनी ज्याप्रकारे मराठा सेवा संघाच्या बदनामीची मोहिम राबविली, जो अपप्रचार केला, जे चुकीचे चित्र उभे केले त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाने काय केले हा प्रश्न पडणे साहजिक आहे. हे लिखाण वाचुन त्यांच्या माहितीत थोडी जरी भर पडली तर या लिखाणामागचा उद्देश साध्य झाला म्हणता येईल…

– अनिल माने

#BloodlessRevolution #MarathaSevaSangh