MPSC विद्यार्थी मुक मोर्चा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये सध्या नाराजीची लाट पसरली असुन त्यांनी आपल्या विविध मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी मोर्चाच्या लोकशाही मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.

️काय आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या ?

1) शासकीय नोकऱ्यांतील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी.

2) MPSC राज्यसेवेच्या जागा ६९ वरुन वाढवण्यात याव्यात.

3) संयुक्त (Combine) PSI-STI-ASO परीक्षा पद्धत रद्द करून पुर्वी प्रमाणे स्वतंत्र परीक्षा पद्धत राबवावी.

4) स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेल्या डमी सारख्या गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवावा.

5) बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी.

6) परीक्षा केंद्रावरती मोबाईल जामर सारखी यंत्रणा बसवावी.

7) आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण आयोगाने द्यावे.

8) स्पर्धा परीक्षांमधील भरती घोटाळा उघडकीस आणणारे श्री.योगेश जाधव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी.

9) परीक्षा केंद्रामधील बैठक व्यवस्था हि CCTV ने सुसज्ज असावी.

10) परीक्षेसाठीची प्रवेश फी हि माफक असावी जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही.

11) खाजगी तत्वावर तात्पुरती पदे भरण्याची पद्धत रद्द करुन कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी.

12) प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी.

कुठे कुठे आहे मोर्चा ?

● नाशिक- दिनांक 31 जानेवारी रोजी पार पडला.

● ️इस्लामपूर(सांगली)- दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पार पडला.

● औरंगाबाद- दिनांक 6 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या पार पडला.

● ️यवतमाळ- दिनांक 7 फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडला.

● ️कोल्हापूर- दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पार पडला

● मंगरुलपीर ( वाशीम )- दिनांक 7 फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडला.

● अहमदनगर- दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पार पडला.

● ️बीड- दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पार पडला.

● ️पुणे – दिनांक- 8 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता

ठिकाण- शनिवार वाडा

मार्ग- शनिवार वाडा – मालधक्का चौक – जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.

● ️बारामती – दिनांक- 8 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता

ठिकाण- छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कसबा, बारामती

● ️परभणी – दिनांक – 8 फेब्रुवारी सकाळी 12 वाजता

ठिकाण- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

मार्ग- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

● ️नागपूर – दिनांक – ८ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता

ठिकाण – सक्खरदरा चौक, नागपूर.

मार्ग – छोटा ताजबाग चौक, रघुजी नगर ते सक्करदरा चौक नागपूर.

● ️उस्मानाबाद – दिनांक- 8 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता

ठिकाण- लेडीज क्लब, तांबरी विभाग, उस्मानाबाद

मार्ग – लेडीज क्लब, तांबरी विभाग ते जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद

● नांदेड – दिनांक- 9 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता

ठिकाण- ITI चौक, नांदेड

मार्ग- ITI चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.

______________________________________

साभार – MPSC आंदोलन २०१८

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top