कुणबी दाखला प्रक्रिया

विविध ऐतिहासिक संदर्भ, न्यायालयीन निकाल इत्यादिंच्या माध्यमातुन तसेच अनेक अभ्यासक, इतिहाससंशोधक, मानववंशशास्त्रज्ञांच्या अभ्यासातुन मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सिद्ध करता येते. मात्र शासनाच्या आरक्षण धोरणांत मराठा ओपनमध्ये आणि कुणबी ओबीसीमध्ये असे वेगवेगळे दाखवुन मराठा समाजाला कायम आरक्षणापासुन वंचित ठेवले आहे. मराठा हा मुळचा कुणबीच असल्याने त्याला सरसकट ओबीसी प्रवर्गातुनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासुन महाराष्ट्रात संघर्ष सुरु आहे. राजकीय पातळीवर असणारा इच्छाशक्तीचा अभाव आणि काही मराठाद्वेष्ट्या लोकांमुळे हा प्रश्न गेली काही वर्षे रेंगाळला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी, न्यायालयीन प्रक्रियेला किती वेळ ते लागेल सांगता येत नाही.

एका बाजुला मराठा आरक्षणासाठी संघटीतपणे सामाजिक संघर्ष सुरु असतानाच दुसऱ्या बाजुला वैयक्तिक पातळीवर रितसर कायदेशीर प्रक्रियेने कुणबी जात प्रमाणपत्र कसे मिळवता येईल यासाठी मराठा समाजबांधवांनी प्रयत्न करायला हवेत. मराठ्यांनी कुणबी दाखला काढणे म्हणजे जात बदलणे असा अर्थ नसुन ओपन प्रवर्गातुन ओबीसी प्रवर्गात जाणे असा आहे. अपप्रचाराला बळी पडुन मराठा समाजाने स्वतःचे नुकसान करुन घेऊ नये. कुणबी दाखला मिळवण्यासाठीची पुर्वतायरी, आवश्यक कागदपत्रांची जुळणी आणि संपुर्ण प्रक्रियेची माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

(मराठा व कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.)

जात प्रमाणपत्र काढण्यापुर्वी या गोष्टी माहीत असाव्यात.
जात प्रमाणपत्राच्या आधारे आपल्याला विविध सरकारी सेवा, सवलतींचा लाभ घेणे शक्य होते.
उदा.१.सरकारी नोकरीत आरक्षण, वयोमर्यादेत सवलत
२.शैक्षणिक प्रवेशात राखीव जागा, ऍडमिशन फीमध्ये सवलत, शिष्यवृत्ती
३.राजकीय आरक्षित जागा, इत्यादि.

जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते. मात्र प्रमाणपत्र काढते वेळी जर अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण नसेल तर त्याचे पालक तसे प्रतिज्ञापत्र सादर करुन जात प्रमाणपत्र प्राप्त करु शकतात. खोटे जात प्रमाणपत्र तयार करणे हा गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास असे करणाऱ्यांना मिळालेले सर्व लाभ तात्काळ काढुन घेतले जातात. तसेच त्याला कायद्यात शिक्षेची तरतुद आहे.

महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गाला १९% आरक्षण असुन हेच प्रमाण देश पातळीवर २७% आहे. कुणबी ही जात ओबीसी प्रवर्गात अ.क्र.८३ वर कुणबी (पोटजाती – लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी व कुणबी मराठा) अशी येते. सर्व पोटजातींसाठी “कुणबी” असाच दाखला मिळतो.

ओबीसी प्रवर्गासाठी मानीव दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ असल्याने कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदार किंवा त्याचे रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजेच वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा वगैरे यांचे वास्तव्य महाराष्ट्रात १३ ऑक्टोबर १९६७ अगोदरपासुन असणे आवश्यक आहे.

कुणबी आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढे दिलेले सर्व दाखले असावे लागतात.
१) कुणबी जात प्रमाणपत्र
२) कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र
३) उत्पन्नाचा दाखला
४) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
५) डोमीसाईल प्रमाणपत्र

हे सर्व दाखले काढण्यासाठीची पुर्वतयारी, आवश्यक कागदपत्रे आणि संपुर्ण रितसर प्रक्रिया याची माहिती खालील लिंकवर देण्यात आली आहे. लिंकवर दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया करुन हे सर्व दाखले काढुन घ्यावेत आणि त्याच्या आवश्यक तेवढ्या साक्षांकित प्रती तयार करुन फाईलला जोडुन ठेवाव्यात.

१) असे काढा कुणबी जात प्रमाणपत्र (क्लिक करा)

२) असे काढा कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र (क्लिक करा)

३) असा काढा उत्पन्नाचा दाखला (क्लिक करा)

४) असे काढा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (क्लिक करा)

५) असे काढा वय, अधिवास व राष्ट्रीयत्व (डोमीसाईल) सर्टिफिकेट (क्लिक करा)

(कृपया परवानगीशिवाय हा मजकुर इतरत्र छापु नये.)

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top