कोपर्डी प्रकरणाचा संपुर्ण घटनाक्रम

कोपर्डी ता.कर्जत जि.अहमदनगर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अमानुषपणे अत्याचार करुन तिचा खुन करणाऱ्या जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तीन नराधमांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. गुन्हा झाल्यापासुन ते फाशीची शिक्षा सुनावणी होईपर्यंत गेल्या १६-१७ महिन्यात घडलेल्या घटनांचा हा संपुर्ण घटनाक्रम…

● १३ जुलै २०१६ – कोपर्डी ता.कर्जत येथील नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरुन पाठलाग करुन पकडले आणि संध्याकाळी निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली.

● १४ जुलै २०१६ – मध्यरात्री गुन्हा दाखल. प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदेला श्रीगोंदे येथुन अटक. दुपारी कर्जत बंद आणि रास्ता रोको. कोपर्डीच्या भगिनीवर अंत्यसंस्कार. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडियातुन दुर्लक्ष, सोशल मिडियावरुन बातमी सर्वत्र.

● १५ जुलै २०१६ – आरोपी जितेंद्र शिंदेला पोलीस कोठडी, कोपर्डीत चुल बंद. जामखेड, श्रीगोंदा बंद.

● १६ जुलै २०१६ – कर्जत येथे सर्वपक्षीय, संघटनांचा रास्ता रोको. दुसरा आरोपी संतोष भवाळ याला अटक. नगर बार असोसिएशनचा आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव.

● १७ जुलै २०१६ – तिसरा आरोपी नितीन भैलुमे याला अटक. आरोपींना न्यायालयात आणले जात असताना शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडुन त्यांच्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न.

● १८ जुलै २०१६ – विधिमंडळात खडाजंगी. विरोधकांकडुन कामकाज बंद. राज्यभरात पडसाद. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चांना सुरुवात. CID कडे प्रकरणाचा तपास देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

● १९ जुलै २०१६ – विधानसभेत विरोधकांकडुन आरोपींना फाशीची मागणी

● २१ जुलै २०१६ – दलित नेते प्रकाश आंबेडकर यांना कोपर्डीत जाण्यापासुन पोलिसांनी रोखले.

● २३ जुलै २०१६ – केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रिपब्लिकन नेते आठवलेंना न भेटण्याचा पिडितेच्या कुटुंबियांचा निर्णय.

● २४ जुलै २०१६ – मुख्यमंत्र्यांची कोपर्डीत पिडितेच्या कुटुंबियांना भेट. एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन, विशेष सरकारी वकील म्हणुन उज्वल देशमुख यांच्या नावाची घोषणा.

● २५ जुलै २०१६ – न्यायालायत महिलांकडुन आरोपींना मारहाणीचा प्रयत्न. घटनास्थळी आरोपींना नेऊन पोलिसांकडुन पंचनामा.

● ९ ऑगस्ट २०१६ – मराठा क्रांती मोर्चांना औरंगाबादमधुन सुरुवात. तीन लाखांहुन अधिक लोक सहभागी.

● ७ ऑक्टोबर २०१६ – कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींविरोधात घटनेनंतर ८५ दिवसांनी ३२० पानांचे दोषारोपपत्र दाखल.
● २० ऑक्टोबर २०१६ – कोपर्डी खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात सुरुवात

● १ एप्रिल २०१७ – शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडुन न्यायालयाच्या आवारात आरोपींवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न.
● २४ मे २०१७ – कोपर्डी खटल्यातील सुनावणी पुर्ण. निकम यांच्याकडुन ३१ साक्षीदार तर बचाव पक्षाकडुन एका तपासणी पुर्ण.
● २ जुलै २०१७ –कोपर्डीत भैयु महाराजांकडुन निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय, राज्यभरातुन मराठा संघटनांचा विरोध.

● १३ जुलै २०१७ – कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पुर्ण.  राज्यभरातुन आलेल्या मराठा समाजबांधवांकडुन पिडितेला श्रद्धांजली. गर्दी कमी झाल्यावर भैयु महाराजांच्या संस्थेकडुन निर्भयाचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न होताना मराठा संघटना-भैयु महाराज वाद. पिडितेच्या आई-वडिलांकडुन पुतळा न बसवता साधी समाधी व्हावी अशी अपेक्षा.
● ९ ऑक्टोबर २०१७ – कोपर्डी खटल्याची सुनावणी पुर्ण.
● २६ ऑक्टोबर २०१७ – कोर्टात अंतीम युक्तीवादाला सुरुवात
● ८ नोव्हेंबर २०१७ – कोर्टातील अंतिम युक्तिवाद संपला.

● १८ नोव्हेंबर २०१७ – कोर्टाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले.
● २१ नोव्हेंबर २०१७ – जितेंद्र शिंदे, संतोष भवाळच्या वकिलांकडुन कोर्टात फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी.

● २२ नोव्हेंबर २०१७ – नितीन भैलुमेच्या वकिलांकडुन आरोपी गरीब असल्यामुळे कमी शिक्षेची मागणी. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत फाशीची मागणी लावुन धरली. आरोपींवरील शिक्षेची सुनावणी तारीख कोर्टाकडुन ७ दिवस पुढे ढकलण्यात आली.

● २९ नोव्हेंबर २०१७ –  कोर्टाकडुन कोपर्डी प्रकारणातील आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांना फाशीची शिक्षा जाहीर. कोपर्डी पिडितेच्या कुटुंबियांकडुन निर्णयाचे स्वागत. महाराष्ट्रभरातुन समाधानकारक निकाल दिल्याबद्दल महिला वर्ग, सर्वसामान्य नागरिकांकडुन न्यायव्यवस्थेचे आभार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया.

©लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top